मुंबई : खासदार नारायण राणे यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होती. पण आता त्यांना त्यांच्याच पक्षाने जोरदार झटका दिला आहे. कारण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नारायण राणेंनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रपती राजवटीची राणेंची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही आणि भाजपने तशी मागणी केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
राष्ट्रपती राजवटीची राणेंनी केलेली मागणी ही भाजपची अधिकृत मागणी नाही
कोरोना संकट हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरत आहे आणि त्याला रोखण्याची या सरकारमध्ये क्षमता नसल्यामुळे या सरकारला नारळ देऊन राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. सरकार चालवण्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर गहिरे संकट असल्याचे नारायण राणे म्हणाले होते.