भाजप आमदाराची मागणी; अनुष्काला विराटने घटस्फोट द्यावा


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्या अडकली आहे. सीरिजमध्ये गोरखा सुमदायाने जातीवाचक शब्द वापरल्यामुळे काही दिवसांपूर्वी अनुष्काला कायेदशीर नोटीस बजावण्यात आली होती. आता आपल्या संमतीशिवाय आपला फोटो एका गुन्हेगारासोबत वापरल्यामुळे गाझियाबादमधील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी या सीरिजवर टीका केली होती. तसेच या वेब सीरिजमध्ये गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण दाखवण्यात आल्याचे म्हटले होते. भाजप आमदाराने या वादावरुन विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली आहे.

या संदर्भात नंदकिशोर गुर्जर यांची ‘न्यूजरुम पोस्ट’ने मुलाखत घेतली. त्यांनी त्यामध्ये देशापुढे कोणीही मोठे असू शकत नाही. आजवर देशासाठी विराट कोहली खेळत आला आहे. देशाचे नाव त्याने मोठे केले आहे. तो देशभक्त असल्यामुळे अनुष्काला त्याने तात्काळ घटस्फोट द्यायला हवा. विराटसोबत अनुष्का राहत आहे आणि राष्ट्रदोहाचे काम तिने केल्याचे म्हणत गुर्जर यांनी विराटला सल्ला दिला आहे.


नंदकिशोर गुर्जर यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रक जारी केले होते. या पत्रकामध्ये अनुष्का शर्माने तिच्या वेब सीरिजमध्ये एका गुन्हेगारासोबत नंदकिशोर गुर्जर यांचा फोटो दाखवला होता. तसेच तिने तो दाखवण्याआधी त्यांची संमती घेतली नव्हती. तिने या कृत्यातून गुर्जर समुदायाचा अपमान केला आहे. त्याचबरोबर या वेब सीरिजमध्ये गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण दाखवण्यात आल्यामुळे पाताल लोक या वेब सीरिजवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

Loading RSS Feed

Leave a Comment