श्रमिक एक्सप्रेसमधून प्रवास करताना झाले बाळ, नाव ठेवले ‘लॉकडाऊन यादव’

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दुसरीकडे अनेक जोडपी आपली नवजात बाळांची नावे या महामारीवरून ठेवत आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशमधील एका जोडप्याने आपल्या जुळ्या बाळांची नावे ‘सॅनिटायझर’ आणि ‘क्वारंटाईन’ ठेवल्याचे समोर आले होते. आता आणखी एका महिलेने आपल्या मुलाचे नाव चक्क ‘लॉकडाऊन यादव’ ठेवले आहे.

Image Credited – oneindia

आणखी वाचा : कोरोनात मिळाली खुशी, जुळ्यांची नावे ठेवली क्वारंटाईन आणि सॅनिटायझर

मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या रीता यादव या मुंबईवरून श्रमिक एक्सप्रेसमधून आपल्या घरच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र त्यांना अचानक प्रसुती कळा सुरू झाल्याने त्यांना मध्य प्रदेश येथील बुरहानपूर येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्यांना मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव त्यांनी ‘लॉकडाऊन’ यादव ठेवले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पृथ्वीराज सिंग चौहान यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. हे बाळ मध्य प्रदेशचे असल्याचे चौहान म्हणाले. चौहान यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिला घरी पाठविण्यासाठी प्रशासनाचे आभार मानत आहे.

Leave a Comment