कोरोनात मिळाली खुशी, जुळ्यांची नावे ठेवली क्वारंटाईन आणि सॅनिटायझर

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात उत्तर प्रदेशच्या मेरठमधील मोदीपुरम भागा येथील पबरसा गावातील एका महिलने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या जोडप्याने आपल्या बाळांचे नाव क्वारंटाईन आणि सॅनिटायझर ठेवले आहे. लॉकडाऊनमध्ये या मुलांची नावे चर्चेचा विषय ठरत आहेत.

पबरसा गावातील धर्मेंद्र कुमार यांच्या पत्नी वेनू यांच्या पत्नी गर्भवती होत्या. त्यांच्यावर एक महिला डॉक्टर उपचार करत होती. मात्र प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर महिला डॉक्टरने कोरोनाच्या भितीने उपचारास नकार दिला. यानंतर धर्मेंद्र यांनी पत्नीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. येथे डॉ. प्रतिमा थोमर यांनी त्यांच्यावर उपचार केले.

धर्मेंद्र यांनी सांगितले की पत्नी व दोन्ही बाळ व्यवस्थित आहेत. दोन्ही मुलांची नावे क्वांरटाईन आणि सॅनिटायझर ठेवल्याने गावात चर्चेचा विषय ठरला.

Leave a Comment