टीक-टॉकचे रेटिंग सुधारण्यासाठी गुगलने हटवले लाखो रिव्ह्यू

मागील काही आठवड्यांमध्ये चायनीज शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉक विविध कारणांमुळे वादात अडकले होते. लाखो युजर्सनी टिकटॉकला प्ले स्टोरवरून 1 स्टार रेटिंग देण्यास सुरूवात केल्याने टिकटॉकचे रेटिंग 4.5 स्टार वरून 1.2 स्टारवर आले होते. टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी देखील अनेक युजर्सनी केली होती. मात्र आता 22 मिलियन युजर्स रिव्ह्यूसह टिकटॉकची प्ले स्टोरवरील रँकिंग सुधरून 1.5 स्टार्स झाली आहे. यामागचे कारण गुगलने लाखो युजर्सचे रिव्ह्यू हटवणे असू शकते.

आणखी वाचा : … म्हणून भारतीय युजर्स टीक-टॉकला देत आहेत 1 स्टार रेटिंग

नोबर्ट इलेक्स या ट्विटर युजरने दावा केला आहे की, गुगलने लाखो टिकटॉक रिव्ह्यू हटवल्याने रेटिंग 1.2 स्टार्सवरून 1.6 स्टार्स झाले आहे. त्याने दोन फोटो शेअर केले आहेत. यात एकामध्ये 28 मिलियन रिव्ह्यूसह रेटिंग 1.2 स्टार्स दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये 27 मिलियन रिव्ह्यूसह 1.6 स्टार्स रेटिंग दिसत आहे. सध्या प्ले स्टोरवर 22 मिलियन युजर्ससह टिकटॉकचे रेटिंग 1.5 स्टार्स आहे. म्हणजेच एका आठवड्यात गुगलने 6 मिलियन युजर्सचे रिव्ह्यू डिलीट केले आहेत.

दरम्यान, टिकटॉकला कमी रेटिंग देण्यासाठी युट्यूबर कॅरी मिनाटीचा एक व्हिडीओ कारणीभूत ठरला आहे. यानंतर आणखी एक कारण म्हणजे लोकप्रिय टिकटॉक क्रिएटर फैझल सिद्दिकीने शेअर केलेल्या एका व्हिडीओवर अ‍ॅसिड हल्ल्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वादानंतर लाखो युजर्सनी टिकटॉकला कमी रेटिंग देण्यास सुरूवात केली होती.

Leave a Comment