भारतात कोट्यावधी युजर्स असलेल्या टिकटॉक अॅप्सचे गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरील रेटिंग मागील काही दिवसात झपाट्याने घटल्याचे समोर आले आहे. यामागे युट्यूबर कॅरी मिनाटीचा एक व्हिडीओ कारणीभूत ठरला आहे. यानंतर आणखी एक कारण म्हणजे लोकप्रिय टिकटॉक क्रिएटर फैझल सिद्दिकीने शेअर केलेल्या एका व्हिडीओवर अॅसिड हल्ल्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युजर्सकडून या अॅपला 1 स्टार रेटिंग्स देण्यात येत आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून टिकटॉकचे रेटिंग 4.5 स्टार्सवरून थेट 2 स्टार्सवर घसरले आहे.
… म्हणून भारतीय युजर्स टीक-टॉकला देत आहेत 1 स्टार रेटिंग
अनेक भारतीय युजर्स या अॅपला 1 स्टार देत, अॅप खराब असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. तर काही युजर्सनी भारतात या अॅपवर बंदी घालण्याची देखील मागणी केली आहे. मात्र अॅपल अॅप स्टोरवर अद्यापही अॅपचे रेटिंग 4.8 स्टार आहे.
युट्यूब स्टार्स आणि टीकटॉक स्टार्स आधीपासूनच एकमेंकाची खिल्ली उडवत आहेत. मात्र युट्यूबर कॅरी मिनाटीने ‘YouTube vs TikTok: The End’ या नावाने व्हिडीओ अपलोड करत टिकटॉक क्रिएटर अमीर सिद्दिकीची खिल्ली उडवली होती. मात्र युट्यूबच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा व्हिडीओ हटविण्यात आला होता. ही गोष्टी कॅरी मिनाटीच्या चाहत्यांना आवडली नाही व त्यांनी टिकटॉकला 1 स्टार देण्यास सुरूवात केली.
कॅरी मिनाटी प्रकरणानंतर फैजल सिद्दिकीच्या अॅसिड हल्ल्याला प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडीओमुळे टिकटॉक पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यामुळे पुन्हा एकदा युजर्सनी या अॅपवर बंदी घालण्याची मागणी करत प्ले स्टोरवर अॅपला 1 स्टार रेटिंग देण्यास सुरूवात केली. या प्रकरणामुळे टिकटॉकचे प्ले स्टोरवरील रेटिंग 4.5 स्टार्सवरून घसरून 2 स्टारवर आले आहे.