राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीची 50 हजाराकडे वाटचाल


मुंबई : देशासह राज्यावर कोरोना सारख्या महामारीचे संकट ओढावले आहे. त्यातच देशात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान काल दिवसभरात राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात 2 हजार 608 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. मागील सात दिवसांपासून राज्यात दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. राज्यात 17 मे पासून दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. तर काल दिवसभरात 60 रुग्णांचा मृत्यू मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूची संख्या 1577 एवढी झाली आहे. काल 821 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 13 हजार 404 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत एकूण 47 हजार 190 लोकांना राज्यात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पैकी 32 हजार 201 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये 40, पुण्यात 14, सोलापुरात 2, वसई विरारमध्ये 1, साताऱ्यात 1, ठाणे 1 तर नांदेड शहरात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज झालेल् मृत्यूंपैकी 42 मृत्यू हे मागील 24 तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवडयातील आहेत.

तर राज्यात कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 48 हजार 026 नमुन्यांपैकी 2 लाख 98 हजार 696 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 47,190 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 85 हजार 623 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 33 हजार 545 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 13,404 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Leave a Comment