अमेरिकेतील प्रतिष्ठित वर्तमानपत्राने छापली कोरोनामुळे मृत पावलेल्यांची यादी


वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला असून अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने आज छापलेल्या बातमीमुळे ट्रम्प सरकारची नाचक्की झाली आहे. अमेरिकेत १ लाख मृत्यू आणि न मोजता येणारी हानी या मथळ्याखाली द न्यूयॉर्क टाईम्समध्ये बातमी करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे यामध्ये देण्यात आली आहे. द न्यूयॉर्क टाईम्सचे आजचे वृत्त जगभरात चर्चेचा विषय बनले आहे.

१ लाखाच्या घरात कोरोनामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा गेला आहे. चीनमधून सुरु झालेला कोरोना आशिया आणि युरोपच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट आफ्रीका आणि नॉर्थ अमेरिकेतही तयार झाले आहेत. दरम्यान चीनने काल कोरोनाचा नवा रुग्ण न आढळल्याची माहिती दिली.

दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशात कोरोनासारखी भीषण परिस्थिती ओढवली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच आपल्या सहकार्यांसहित वर्जिनियातील गोल्फ क्लबला भेट दिली. कोरोनामुळे अमेरिकेतील उद्योग आणि सामाजिक गतीविधी बंद झाल्यानंरची ही पहिली भेट होती. त्यांनी यावेळी चर्च आणि इतर कामाची ठिकाणे सुरु करण्याचे आवाहन केले.

Leave a Comment