जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 53 लाखांवर


मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसचा कहर अद्याप कायमच असून जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 53 लाखांच्या पार पोहचला आहे. जगातील 213 देशांमध्ये मागील 24 तासात 107,706 नवीन कोरोनाबाधित समोर आले आहेत तर काल दिवसभरात कोरोनामुळे 5,245 बळी गेले आहेत. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 53,03,715 लोकांना झाली असून आतापर्यंत 3 लाख 39 हजार 418 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर जगभरात 21 लाख 56 हजार 288 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 40 लाखांच्या घरात आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 1,24,794 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 3,726 बळी गेले आहेत. सध्या भारतात 69,244 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 51,824 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 16,45,084जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 97,640 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 36,393 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,54,195 एवढी आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 28,628 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,81,904 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,616 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 228,658 एवढा आहे.

अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्यावर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 97 हजारांवर गेला आहे.

Leave a Comment