मागील 24 तासांत 288 पोलीस कोरोनाच्या विळख्यात


मुंबई – देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. या संकटकाळात आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षितेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. महाराष्ट्रातील 288 पोलिसांना गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान महाराष्ट्र पोलिस दलातील 1666 पोलिस कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोरोनामुळे 16 पोलिस जवानांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला तरी रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच पोलिस दलातील रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील खूप चांगले आहे. 478 पोलिसांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 35 पोलीस अधिकारी आणि 438 पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

Leave a Comment