आनंदवार्ता! ऑक्सफर्ड विद्यापीठातील कोरोना प्रतिबंधक लस दुसऱ्या टप्प्यात


लंडन : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या या जीवघेण्या संकटात ऑक्सफर्ड विद्यापीठाने आशेचा किरण जागवला आहे. कारण जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचे काम सुरू असतानाच ऑक्सफर्ड विद्यापीठात यावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी प्रतिबंधक लस बनवण्याच्या सुरूवातीच्या टप्प्यात यश मिळाले आहे आणि ते मानवी स्तरावरील चाचणीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात आज तकने दिलेल्या वृत्तानुसार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधक दुसऱ्या स्तरावरील चाचणीसाठी 10,000 हून अधिक लोकांची मदत घेणार आहेत.

कोरोना प्रतिबंधक लशीचे पहिले परिक्षण गेल्या महिन्यात सुरू झाले होते. ज्यामध्ये 55 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या 1000 प्रौढ स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली होती. आता या लशीचा रोग प्रतिकारक्षमतेवर होणारा परिणाम लक्षात घेण्यासाठी 70 वर्षापेक्षा जास्त आणि 5 ते 12 वर्ष वय असणारी मुले असे एकूण 10,200 अधिक लोकांना तपासणीसाठी नामांकित करण्यात येणार आहे.

माकडांवर ChAdOx1 nCoV-19 या लशीच्या केलेल्या छोट्याशा प्रयोगानंतर आशादायक परिणाम दिसून आला आहे. विद्यापीठातील व्हॅक्सिनॉलॉजीच्या प्राध्यापक, जे या संशोधनामध्ये काम करत आहेत त्यांनी अशी माहिती दिली की, लसीच्या शोधसाठी त्यांची टीम खूप मेहनत घेत आहे. यामध्ये ChAdOx1 nCoV-19 ची सुरक्षा, इम्युनोजेनेसिटी आणि प्रभावकारकता याचे आकलन केले जात आहे.

त्यांनी पुढे अशी माहिती दिली की, पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी होण्यासाठी 55 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती सक्षम नव्हत्या. त्यांना आता लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात सामिल करून घेतले जाणार आहे. देशाच्या विविध भागातील लोकांना यामध्ये सहभागी केले जाणार आहे. या संशोधनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींवर अभ्यास केला जाणार आहे.

Leave a Comment