अमिताभ बच्चन आणि आयुष्मानच्या आगामी ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर रिलीज


महानायक अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांची मुख्य भूमिका असलेला आणि दिग्दर्शक शूजित सरकार यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटातील या जबरदस्त स्टारकास्ट तसेच या चित्रपटातील बिग बींच्या लूकमुळे सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे. बिग बी आणि आयुष्मान खुराना यांची जबरदस्त जुगलबंदी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

चित्रपटात अमिताभ हे एका हवेलीचे घरमालक आहेत आणि आयुष्मान खुराना हा त्यांचा भाडेकरु आहे. अमिताभ त्याला घरी खाली करायला सांगत आहेत. पण तो देखील घर खाली करण्यात तयार होत नाही. यामुळे या दोघांमध्ये जबरदस्त तूतू-मैंमैंची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. ती पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल.

आपल्या घराशी प्रत्येक घरमालकाचे थोडी आपुलकी असते. तशीच काहीशी अमिताभ बच्चन यांची आहे. या दरम्यान बिग बी आणि आयुष्मान मध्ये काय काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अमिताभ बच्चन या चित्रपटात मोठी दाढी आणि मोठ्या चष्म्यासह एक वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. या त्यांच्या हटके लूकमुळे त्यांची या चित्रपटात नेमकी काय भूमिका असेल याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 24 एप्रिल 2020 रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता. पण लॉकडाऊन मुळे हा चित्रपट आता 12 जून रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment