राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41642 वर


मुंबई : राज्यात काल दिवसभरात कोरोनाची लागण झालेल्या तब्बल 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 41,642 वर पोहचला आहे. राज्यात या पैकी सध्या 28,454 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 41 जण मुंबई, मालेगाव 9, पुणे 7, औरंगाबाद 3, नवी मुंबईमध्ये 2, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरात प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 1454 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 1408 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यातील पाठवण्यात आलेल्या 3 लाख 19 हजार 710 नमुन्यांपैकी 2 लाख 78 हजार 68 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत; तर 41,642 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 37 हजार 304 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 26 हजार 865 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 11,726 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 36 पुरुष तर 28 महिला आहेत. त्यातील 31 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 29 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 64 रुग्णांपैकी 38 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment