चंद्रकांतदादांचे कोल्हापूरात काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन


कोल्हापूर : भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यात अपयश आल्याचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. आपल्या निवासस्थानासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हातामध्ये मागण्यांचा फलक धरून काळे मास्क घालून महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.

त्याचबरोबर त्यांनी यावेळी हातावर पोट असणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ५० हजार कोटी रूपयांच्या पॅकेजची मागणी देखील केली. त्यांच्यासोबत यावेळी त्यांच्या पत्नी अंजली, मातोश्री सरस्वती बच्चू पाटील, सासुबाई शुभदा खरे, मोहन मेने आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी हे आंदोलन भाजपच्या शहर कार्यालयातून केले. तसेच या आंदोलनामध्ये देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनीही सहभाग घेतला.

Leave a Comment