देशात मागील 24 तासात आढळले साडेपाच हजारांहून अधिक रुग्ण


मुंबई: देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढत असून देशभरात मागील 24 तासात 5 हजार 609 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर 132 जणांनी आपला जीव गमावला आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 359 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 435 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 हजार 300 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 40.31 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले 63 हजार 624 रुग्ण आहेत.

देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 39 हजार 297 झाला आहे. त्यातील 10 हजार 318 बरे झाले आहेत. तर महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 26.25 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 390 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी मुंबईत 24 हजार 118 कोरोनाबाधित सापडले आहेत त्यातील 841 जणांचा बळी गेले आहेत. तर केरळमध्ये 666 रुग्ण त्यातील 502 बरे झाले तर जणांचा 4मृत्यू झाली आहे. केरळचा रिकव्हरी रेट 75.37 टक्के आहे. केरळमध्ये गेल्या दहा दिवसात रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर आला आहे.

Leave a Comment