निराशाजनक…! ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधक लस इन्फेक्शन रोखण्यात अपयशी


नवी दिल्ली – संपूर्ण जगालाचा आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोना या जीवघेण्या व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहे. पण या आजाराला वेसण घालणारी प्रतिबंधक लस कधी येणार याची जगभरातील सगळयाच नागरिकांना प्रतिक्षा आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील मोडर्ना कंपनीने त्या दिशेने एक पाऊल टाकत कोरोना व्हायरसविरोधात लस विकसित केल्याची बातमी आम्ही आपल्याला पर्यंत पोहचवली होती. या प्रतिबंधक लशीमुळे जगभरासह आपल्या देशात देखील एक आशा निर्माण झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी अमेरिकेत आठ स्वयंसेवकांवर करण्यात आली. त्याला बऱ्यापैकी यश मिळाले.

पण आता दुसरीकडे आपला हिरमोड होणारी बातमी सुद्धा आहे. कारण ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली “ChAdOx1 nCoV-19” लस माकडांवर निष्क्रिय ठरली आहे. माकडांमध्ये या लसीला इन्फेक्शन रोखता आलेले नाही. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

जेनर इन्स्टिट्यूट ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत आहे. कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आघाडीवर असल्यामुळे विद्यापीठातील संशोधकांसाठी हा एक मोठा धक्का आहे. ब्रिटनकडून कोरोना व्हायरसवर व्यावसायिक लस उपलब्ध होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.

त्यातच ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ‘द मेल’ मधील आपल्या स्तंभात आपल्याला अजून बरेच लांब जायचे आहे. व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील, असे म्हटले आहे. कोरोनाचा बिमोड करण्यासाठी जगभरात १०० लस संशोधन प्रकल्पांवर काम सुरु आहे.

ChAdOx1 nCoV-19 ही लस ज्या माकडांना देण्यात आली होती. त्यांचा जेव्हा कोरोनाला कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरस बरोबर सामना झाला, तेव्हा शरीरात जास्त प्रमाणात इन्फेक्शन पसरल्याचे डॉ. विलियम हासीलटाइन यांच्या हवाल्याने डेली एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. डेली एक्स्प्रेस हे यूकेमधील एक प्रसिद्ध वर्तमानपत्र आहे. लस टोचण्यात आलेल्या आणि ज्यांना लस दिली नाही अशा माकडांमधील व्हायरल आरएनएच्या प्रमाणात फार फरक नव्हता. याचा अर्थ लस दिली त्यांनाही इन्फेक्शनची बाधा झाल्याचे असे डॉ. विलियम म्हणाले.

Leave a Comment