कोरोनाआडून चीनची नवी कुरापत; भारतही देणार जशास तसे उत्तर


नवी दिल्ली – आपल्या देशातील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असलेला लदाख लडाख हा निसर्ग, सौंदर्याने नटलेला सुंदर प्रदेश असा असून तुमच्यापैकी कोणी जर या प्रेक्षणीय स्थळाला कधी भेट दिली तर तुम्ही एकीच तेथील निसर्गाच्या प्रेमात पडाल. पण याच लडाखमध्ये चीनच्या कुरापती स्वभावामुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. चीनला पहिल्यापासूनच आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत सीमेवरुन वाद घालणे आणि मग दादागिरी करणे ही सवय असल्यामुळे पाकिस्तान, नेपाळ हे देश सोडले तर चीनचे शेजारील एकाही राष्ट्रांसोबत फारसे पटत नाही.

फार पूर्वी काळापासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. दरम्यान सीमावाद कायम असलेल्या पूर्व लदाखच्या काही भागांमध्ये भारत आणि चीन दोघांनी अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. या सैन्य तुकडया डेमचॉक, चुमार, दौलत बेग ओल्डी आणि गालवान व्हॅली या भागामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आता चीनकडून गालवान व्हॅली या भागातही आव्हान देण्यात येत आहे. चिनी सैन्याने गालवान नदीजवळ तंबू उभारुन बांधकाम सुरु केले होते. त्याला भारतीय सैन्याकडून आव्हान देण्यात आल्याचे भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment