मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पोहचू नये याची चीनकडून कोणतीही दक्षता न घेण्यात आल्यामुळेच संपूर्ण जगाने चीनवर जगाने बहिष्कार घालून त्यांना चांगली अद्दल घडवायला हवी, अशी मागणी आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
चीनी वस्तूंवर बहिष्कार घालूनच शिकवला पाहिजे चीनला धडा
कोरोना महामारीबद्दल चीनने जगाला गाफिल ठेऊन दगाबाजी केली आहे. जगभरात या साथीचा संसर्ग वाढण्यास पूर्णपणे चीन जबाबदार असून चीनने त्यावेळी आपल्याकडील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद करायला हवी होती, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
जगाला कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका होऊ नये, चीनने याबाबत कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे चीनवर जगाने बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच जगावर कोरोनाचे संकट लादण्यास सर्वथा चीन जबाबदार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनवर बहिष्कार घातला पाहिजे, असेही आठवलेंनी म्हटले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आजवर संपूर्ण जगात 3 लाखांहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धानंतर आता कोरोनाचे तिसरे जागतिक महायुद्ध सुरु आहे. यात जगातील 190 देश भरडले जात असल्याचे आठवले म्हणाले.