‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होणार अनुराग कश्यपचा नोटाबंदीवर आधारित चित्रपट


दिग्दर्शक अनुराग कश्यप ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजनंतर आता ‘नेटफ्लिक्स’वर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘चोक्ड’ असे असून नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर त्याची कथा रचण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून अमृता सुभाष, उपेंद्र लिमये यांसारख्या मराठी कलाकारांची झलक यात पाहायला मिळते.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री सैय्यामी खेर झळकणार असून ती मध्यमवर्गीय कुटुंबातील काम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. अचानक एके दिवशी तिला किचनच्या पाइपमधून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवलेल्या नोटांचे बंडल मिळते. तिचं आणि तिच्या कुटुंबीयांचे या पैशांमुळे आयुष्य थोडेफार सुधारते. पण त्याच दरम्याम नोटाबंदीची घोषणा होते. यानंतर तिला सापडलेल्या पैशांचे काय होते, ते पैसे कुठून येतात याची उत्सुकता हा ट्रेलर पाहून निर्माण होते.

२०१६साली सैय्यामी खेरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने ‘मिर्झिया’ या चित्रपटात अनिल कपूरच्या मुलासोबत मुख्य भूमिका साकारली होती. ‘चोक्ड’ या चित्रपटात तिच्यासोबत रोशन मॅथ्यू, अमृता सुभाष, राजश्री देशपांडे, उपेंद्र लिमये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Leave a Comment