राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 37,136 वर


मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत काल दिवसभरात तब्बल 2127 नवीन रुग्णांची वाढ झाल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 37,136 वर पोहचला आहे. या पैकी राज्यात सध्या 26,164 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात सर्वाधिक 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 43 जण मुंबई, 15 जण ठाणे तर पुण्यातील 6, अकोला 3, नवी मुंबई, बुलढाणा 2, नागपूर, औरंगाबाद, धुळे, नाशिक शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 1325 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल 1202 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कालपर्यंत राज्यात पाठवण्यात आलेल्या 2 लाख 93 हजार 998 नमुन्यांपैकी 2 लाख 56 हजार 862 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 37,136 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 86 हजार 192 होम क्वॉरंटाईन असून 21 हजार 150 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 9639 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 50 पुरुष तर 26 महिला आहेत. त्यातील 30 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 39 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 7 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 76 रुग्णांपैकी 58 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Leave a Comment