जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांच्या उंबरठ्यावर


मुंबई : कोरोना या जीवघेण्या जगभरात धुमाकूळ घातला असून या रोगाने आतापर्यंत जगभरातील लाखो लोकांना आपल्या विळख्यात घेतले असून जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. आज सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 49,85,825 वर पोहोचला होता. तर या जीवघेण्या आजारामुळे बळी गेलेल्यांची संख्या सव्वातीन लाखांजवळ पोहचली आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत जगभरातील 3,24,889 जणांनी आपले जीव गमावले आहेत. तर जगभरातील 19,58,441 रुग्णांनी या रोगावर यशस्वीरित्या मात केली आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाचे 1,06,750 रुग्ण, तर कोरोनामुळे 3,303 बळी गेले आहेत. सध्या भारतात 60,864 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 42,309 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 15,70,583 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 93,533 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 35,341 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,48,818 एवढी आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,778 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील 278,803 लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,169 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 226,699 एवढा आहे.

जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 93 हजारांवर गेला आहे.

Leave a Comment