भारतात ५ जी सेवेसाठी किमान २ वर्षे प्रतीक्षा

फोटो साभार गायडिंग टेक

जगभर हैदोस घातलेल्या करोनाचा प्रभाव भारतातील ५ जी सेवा सुरु करण्यावर पडणार असल्याचे स्पष्ट झाले असून भारतात ही सेवा सुरु होण्यासाठी किमान दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल असे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने यंदा ५ जी रेडिओवेब शिवायच टेलिकॉम स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया सुरु केली असून या वर्षीचे लिलाव ऑक्टोबरपूर्वी होतील असे समजते. लिलावासाठी व्यवस्थापन आणि सोफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीची अंतिम निवड २२ मे रोजी होणार आहे. त्यासाठी चार कंपन्यांची निवड झाली असून त्यातील दोन कंपन्यांना स्पेक्ट्रम विक्रीचा अनुभव आहे असेही सांगितले जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार लिलाव प्रक्रीयेत ३३००-३६०० मेगाहर्ट्स बँडचा समावेश केला गेलेला नाही. याच रेडिओ वेव्हच वापर फाईव्ह जी साठी होतो. संरक्षण विभागाने ५ जी रेडिओसाठी १०० मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमची मागणी केली असल्याने फक्त १७५ मेगाहर्ट्स शिल्लक राहणार आहे. त्यामुळे किमान दोन वर्षे फाईव्ह जी साठी प्रतीक्षा करावी लागेल असा अंदाज आहे. मूळ योजनेनुसार ८ हजार मेगा स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार असून त्यात ७००, ८००, ९००, १८००, २१००, २३००, २५०० मेगा हर्ट्सचा समावेश आहे. याचे एकूण मूल्य ३ लाख कोटी इतके असल्याचे समजते.

एअरटेल, व्होडा आणि आयडिया यांच्या अनेक परवान्यांचे नुतनीकरण लवकरात लवकर करणे आवश्यक असल्याने हे लिलाव शक्यतो लवकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही समजते.

Leave a Comment