जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिका आणि रशियात


नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांना आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोना व्हायरसने बाधित झालेल्यांची संख्या 48 लाखांच्या पार पोहोचली आहे. या व्हायरसचे जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. तेथील 15 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. पण या आकडेवारीत आता आश्चर्यकारक रित्या रशिया दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरातील 3,20,121 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 19 लाख 07 हजार 992 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 48 लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 लाख 20 हजारांवर पोहोचली आहे.

यासंदर्भात वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोना बाधितांच्या संख्येत कालपर्यंत खालच्या क्रमांकावर असलेला रशिया आज दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. तर अमेरिकेमधील कोरोना बाधितांची संख्या 15 लाखांच्या पार पोहोचली आहे. तसेच रशियामध्ये कोरोना बाधितांचा आकडा 2 लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. दरम्यान, मृतांच्या आकडेवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून त्यानंतर ब्रिटन, इटली आणि फ्रान्सचा क्रमांक आहे.

अमेरिकेत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण असून सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीतही अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अमेरिकेत जवळपास 91 हजार 981 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्रिटनमध्ये 34 हजार 796, इटलीमध्ये 32 हजार आणि फ्रान्समध्ये 28 हजार 239 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये मृतांचा आकडा 27 हजार 709 वर पोहोचला आहे. तर रूसमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली असली तरी देखील स्थिती इतर देशांच्या तुलनेत ठिक आहे. रशियामध्ये आतापर्यंत 2 हजार 722 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा एक लाख पार पोहोचला असून आतापर्यंत 3163 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Comment