भारताच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रावर दावा ठोकत नेपाळने तयार केला नवा नकाशा


नवी दिल्ली : लिपुलेख पासपर्यंत जाणार रस्ता भारताने बांधताच याला नेपाळकडून विरोध करण्यात आला होता. 8 मे रोजी उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख हा 80 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्याठिकाणी हा मार्ग आहे. कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ या मार्गामुळे वाचणार आहे. पण नेपाळने त्यावर आक्षेप घेत आता लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित केला आहे.

सोमवारी अतिक्रमण म्हणून पिथौरागडच्या गर्बाधार-लिपुलेख मार्गाचा निषेध करणारा एक नवीन नकाशा नेपाळने जाहीर केला. नेपाळने यामध्ये पिठौरागड लिपी व कलापानी यांना आपला प्रदेश असल्याचे वर्णन करून नवीन आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करण्याचा दावा केला आहे. उत्तराखंडला लागून असलेल्या केवळ 805 किमीची सीमेमध्ये नेपाळने बदल केला आहे. लडाख, हिमाचल, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्किमसह चीनची सीमा आहे तशीच ती नकाशात ठेवण्यात आली आहे.

रविवारी हा नवीन राजकीय नकाशा नेपाळच्या मंत्रिमंडळात सादर करण्यात आला. मंत्रीपरिषदेने दिवसभर मंथन व परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर सोमवारी सर्वानुमते नवीन नकाशावर शिक्कामोर्तब केले. यात लिपीसह कलापानीने आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करून सामरिक महत्त्व असलेल्या दोन्ही बाबींचा निर्णय घेतला.

या दोन क्षेत्रावरील अतिक्रमणाचा उल्लेखही नकाशाच्या चिठ्ठीत त्यांनी केला असून, नेपाळने यासह पिथौरागडच्या कुटी, नबी आणि गुंजीवर दावा केला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत नेपाळच्या मंत्रिपरिषदेने नवीन नकाशाला दुजोरा दिला आणि अभ्यासक्रमामध्येही त्याचा समावेश करण्यात येईल, असे सांगितले.

भारताने हा नकाशा 2 नोव्हेंबर 2019 रोजी जाहीर केला. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापानी यांचा यामध्ये समावेश होता. यावर नेपाळने आक्षेप घेतला आणि त्याला प्रत्यक्ष नकाशाच्या विरोधात संबोधले. दोन्ही देशांमधील वादानंतर हा वाद शांत झाला असला तरी, चीनच्या सीमेवर असलेल्या गर्बाधार-लिपुलेख रस्त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नेपाळने नवीन वादाला सुरूवात केली आहे.

Leave a Comment