देशातील या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर वापरली जात आहे म्युझिक थेरेपी


मेरठ : जगभरातील अनेक देश जीवघेण्या कोरोना प्रतिबंधक लस किंवा औषधांवर संशोधन करत असतानाच दुसरीकडे वेगवेगळी औषध वापरून या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पण उत्तर प्रदेशमधील एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर औषधांनी नव्हे तर त्यांच्यावर म्युझिक थेरेपीचा वापर केला जाता आहे. या रुग्णांना गाणी ऐकवली जात आहे आणि यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा दावा तेथील डॉक्टर करत आहेत.यासंदर्भातील वृत्त आयबीएन लोकमतने दिले आहे.

कोविड-19 इन्स्ट्रुमेंटल म्युझिक मेरठच्या एका रुग्णालयात सुरू असते. याबाबत डॉक्टर सांगतात की, कोरोना रुग्ण या थेरीपीमुळे खूप आनंदी आहेत. हा उपक्रम मेडिकल कॉलेज रुग्णालयातील रुग्णांची मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. कोविड वॉर्डमध्ये दिवसातून तीन वेळा सौम्य आवाजात संगीत लावले जाते, ज्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये उत्साह येतो.

याबाबत माहिती देताना कोविड वॉर्डचे प्रभारी डॉक्टर सुधीर राठी हे सांगतात की, कोरोना रुग्णांना बरे करण्यात म्युझिक थेरेपी मोलाची भूमिका बजावत आहे. या थेरेपीमुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढत आहे. लखनौतील डॉक्टर वेदप्रकाश यांच्या सल्ल्यानुसार कोविड वॉर्डमध्ये आणखी काही सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत, ज्याचे कोरोना बाधित रुग्णांनी स्वागत केले आहे. रुग्णालयातील डॉक्टर्सच्या मते, सौम्य आवाजात म्युझिक लावल्याने रुग्णांचे फक्त मनोरंजनच होत नाही तर त्यांच्या प्रकृतीतवरही सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी मेरठमधील कोरोनाचे रुग्ण नाचताना दिसून आले होते. त्याचबरोबर याच रुग्णालयातील 85 वर्षीय कोरोनाग्रस्त महिले कोरोनावर मात करून घरी परतली होती. त्यामुळे आता येथील रुग्णांचा आत्मविश्वास वाढला असून सोशल मीडियावर येथील कित्येक रुग्ण गाण्यावर डान्स करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Leave a Comment