उत्तर प्रदेश पोलिसांचा निर्दयीपणी ; रखरखत्या उन्हात मजुरांना लोटांगण घालण्याची शिक्षा


लखनौ: उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यात रखरखत्या उन्हात स्थलांतरित मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार घडला आहे. रेल्वे रुळांच्या बाजूने हे प्रवासी मजूर आपल्या गावी पायी निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी एका फाटकाजवळ त्यांना रोखले. त्यावेळी या मजुरांनी मास्क घातले नसल्यामुळे त्यांना पोलिसांनी रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा दिली. रखरखत्या उन्हामुळे तापलेल्या रस्त्यावर या मजुरांना लोटांगण घालायला लावून पोलिसांनी त्यांना मारहाण देखील केली.


तिथे उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये पोलिसांनी मजुरांना दिलेली अमानुष शिक्षा आणि त्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ चित्रित केल्यानंतर त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर पोलीस खात्याने त्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. कडाक्याच्या उन्हात मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालायला लावणाऱ्यांमध्ये पोलीस शिपायाचा आणि होमगार्डचा समावेश आहे.

Leave a Comment