भारतीय वंशांच्या 10 वर्षीय कोरोना वॉरिअर मुलीचा ट्रम्प यांच्याकडून सन्मान


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीत असणाऱ्या नर्स आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांना बिस्कीटे आणि कार्ड पाठवत त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या दहा वर्षीय श्रव्य अन्नापारेड्डी या मुलीचा गौरव केला आहे. श्रव्या गर्ल स्काऊट ट्रूपची सदस्य आहे आणि मेरीलँडमधील हॅनोव्हर हिल्स एलिमेंटरी स्कूलमध्ये ती चौथ्या इयत्तेत शिकत आहे.

राष्ट्रपती ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी शुक्रवारी या मुलीसह कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी तैनात केलेल्या जवानांना मदत करणार्‍या अमेरिकन नायकांचा सन्मानित केले.

वॉशिंग्टन टाईम्स यांनी एका बातमीत राष्ट्रपती संबंधित हवाल्याच्या माध्यमातून सांगितले की, आज आपण ज्या पुरुष आणि स्त्रियांचा सन्मान करीत आहोत, ते आपल्याला आठवण करून देतात की आपणास कठीण काळात जे प्रेम मिळाले ते आपल्याला आपुलकीच्या नवीन उंचीवर नेऊ शकते. ट्रम्प यांनी सन्मानित केलेल्या तीन गर्ल स्काऊट मुलींमध्ये श्रव्याचा समावेश आहे. तिचे पालक आंध्र प्रदेशचे आहेत.
वृत्तानुसार गर्ल स्काऊटच्या या मुलींनी स्थानिक डॉक्टर, परिचारिका व अग्निशामक दलाकडे 100 बॉक्स बिस्कीटे पाठविली होती. त्याचबरोबर त्यांनी हातांनी तयार केलेले 200 कार्ड पाठविले होते.

Leave a Comment