फक्त स्पेशल ट्रेन, पार्सल आणि मालगाड्या लॉकडाऊन 4 मध्ये धावणार


नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आजपासून चौथा टप्पा सुरु झाला असून भारतीय रेल्वेने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कामगार विशेष, इतर विशेष गाड्या, पार्सल सेवा आणि फक्त मालगाड्या सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जून पर्यंत सर्व नियमित प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत.

25 मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पार्सल सेवा आणि मालवाहतूक गाड्या लॉकडाऊनच्या सर्व टप्प्यात सुरू आहे. त्याचबरोबर परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्यासाठी रेल्वेने 1 मेपासून कामगार विशेष ट्रेन चालवण्यास सुरूवात केली. देशातील 15 मार्गावरची वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे. भारतीय रेल्वचे प्रवक्ता आरडी वाजपेयी म्हणाले, रेल्वेच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे लागू राहतील. श्रमिक विशेष आणि प्रायोगिक तत्वावरील 15 विशेष गाड्या सुरू राहणार आहे. यामध्ये पार्सल आणि मालवाहतूक गाड्यांचा देखील समावेश असणार आहे.

Leave a Comment