स्विगीमधील ११०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा


नवी दिल्ली – झोमॅटोमागोमाग आता आगामी काही दिवसात ऑनलाइन फुड डिलिव्हरी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेली स्विगी आपल्या १,१०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार असून कर्मचाऱ्यांची कंपनीच्या मुख्यालयासह देशातील वेगवेगळया शहरातून कपात करण्यात येणार आहे. यासंदर्भातील एक ई-मेल स्विगीचे सीईओ श्रीहर्ष मजेठी यांनी सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

हा निर्णय लॉकडाउन 4.0 च्या पहिल्याच दिवशी समोर आला असून कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाउन सुरु आहे. हॉटेल, फूड सेंटर मागील दीड महिन्यांपासून बंद असल्यामुळे त्याचा व्यवसायावर मोठा परिमाण झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच स्विगीची स्पर्धक कंपनी असलेल्या झोमॅटोने देखील आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी आहे. लॉकडाऊनचा फूड डिलिव्हरी बिझनेसला मोठा फटका बसला आहे. हा परिणाम फार कमी काळासाठी कायम राहणार आहे. पण त्यानंतर पुन्हा व्यवसाय वाढीला चालना मिळेल, असे स्विगीच्या सहसंस्थापकांनी आपल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment