करोना संक्रमितांचा आकडा, चीनचा खोटारडेपणा उघड

फोटो साभार अनाडोलू एजन्सी

चीनच्या वुहान मधून पसरलेल्या कोविड १९ च्या साथीमध्ये चीन मध्ये कोविड १९ चे ८४ हजार संक्रमित आढळल्याचे चीनने यापूर्वी जाहीर केले असले तरी चीनच्याच लष्कराकडून संचालित करण्यात येत असलेल्या  नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नोलॉजी मधून लिक झालेल्या अहवालात चीनचा खोटारडेपणा समोर आला आहे. या अहवालातील नोंदीनुसार चीनच्या २३० शहरात कोविड १९ चे ६ लाख ४० हजार संक्रमित आहेत.

या नोंदण्या करताना प्रत्येक एन्ट्री एका रुग्णासाठी आहे असे धरले तरी ही संख्या ६.४ लाख असून प्रत्येक एन्ट्री ही दोन रुग्णांसाठी असल्याचा दावा काही जणांकडून केला जात आहे. यात तपासणी कुठे झाली त्याची तारीख, ठिकाण यांची माहिती असून यात फेब्रुवारीच्या अगदी सुरवातीपासून ते एप्रिल पर्यंतची आकडेवारी आहे. त्यात लोकेशन मध्ये केवळ रुग्णालयेच नाहीत तर निवासी अपार्टमेंट, हॉटेल्स, सुपर मार्केट, रेल्वे स्थानके, रेस्टॉरंट, शाळा, फास्टफूड चेन अश्या सर्व ठिकाणी नागरिकांच्या चाचण्या घेतल्या गेल्याचे उल्लेख आहेत. अर्थात यात रुग्णाचे नाव दिले गेलेले नाही.

करोनावर पूर्ण नियंत्रण मिळविल्यावर चीन मध्ये पुन्हा करोनाचे २१ रुग्ण सापडले असून त्यातील १३ रुग्णात कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. आता पुन्हा एकदा वुहान मधील सर्व नागरिकांच्या कोविड चाचण्या केल्या जाणार आहेत. नुकतेच चीनने डिसेंबर १९ मध्ये चीनच्या प्रयोगशाळेतून तपासले गेलेले अनेक नमुने नष्ट केले गेल्याची कबुली दिली आहे. अमेरिकेने सुरवातीपासूनच चीन करोना मृतांचे खोटे आकडे देत असल्याचे आरोप केले होते.

Leave a Comment