ट्रम्प यांनी देऊ केलेल्या मदतीचे मोदींकडून स्वागत


नवी दिल्ली : शुक्रवारी (16 मे) रात्री उशिरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्याची ट्विटरच्या माध्यमातून मोठी घोषणा केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता भारतापुढे मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. या अदृश्य शत्रूचा भारत आणि अमेरिका मिळून सामना करू, असे यांनी ट्रम्प म्हटले आहे. या ट्विटनंतर ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्वागत करत त्यांचे आभार मानले.


ट्विटमध्ये मोदी म्हणाले, ट्रम्प यांचे आभार, या साथीच्या विरोधात आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढा देत आहोत. अशा वेळी, राष्ट्रांनी एकत्र काम करण्यासाठी जितके शक्य असेल तितके सहकार्य करणे आणि जगाला कोरोनामुक्त करणे आवश्यक आहे.

ट्रम्प आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते, मित्र राष्ट्र असलेल्या भारताला अमेरिकेकडून व्हेंटिलेटर्स दान करण्याची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आम्ही आहोत. मैत्रीपूर्ण संबंध असलेला भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा पराभव करू. यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही लस विकसित करण्याचे कार्य भारत आणि अमेरिका दोन्ही देश करत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी सांगितले आहे.

Leave a Comment