कंटेनमेंटमुळे कोरोनावर नियंत्रण शक्य – आरोग्य मंत्रालय

गणितीय मॉडेलिंगवर आधारित अभ्यासानुसार कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, मात्र याची पुर्ण खात्री देता येणार नाही. कारण मनुष्यापासून मनुष्याला संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय कोव्हिड-19 वर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही व हायड्रोक्सीक्लोरोक्विनसोबत केमोप्रोफिलॅक्सिसची आरोग्य कर्मचाऱ्यांना शिफारस करण्यात आली आहे.

सरकारने नियंत्रण योजना तयार केली असून,  या योजनेचा उद्देश एखाद्या भौगोलिक भागातील सुरूवातीच्या टप्प्यातील कोरोनाग्रस्तांची ओळख करणे, संसर्गाची साखळी तोडणे आणि भागात कोरोनाचा प्रसार रोखणे हा आहे. अंतर्गत समन्वयासाठी राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समिती (एनसीएमसी) आणि सचिवांची समिती (सीओ) काम करेल.

भारत प्रवासांतर्गत होणारा संसर्ग, स्थानिक संसर्ग, कम्युनिटी ट्रांसमिशन यावर धोरणात्मकरित्या काम करेल. कल्सटर कंटेनमेंट योजनेंतर्गत भौगोलिक क्वारंटाईन, सोशल डिस्टेंसिंगचे नियम, संशयित रुग्णांचे टेस्टिंग, आयसोलेशन, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन आणि लोकांना जागृक केले जाईल.

आरोग्य मंत्रालयाच्या कागदपत्रानुसार, गणितीय मॉडेलिंग अभ्यासानुसार सोशल डिस्टेंसिंगचे योग्यरित्या पालन केल्यास व्हायरसवर नियंत्रण मिळवणे कदाचित शक्य होईल. व्हायरसचा उद्रेक रोखण्यासाठी सरकारने काही घटक देखील निश्चित केले आहेत. यामध्ये भौगोलिक भागानुसार व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा शोध घेणे, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग, संशयितला त्वरित आयसोलेट करणे आणि संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याचा समावेश आहे.

Leave a Comment