पृथ्वीराज चव्हाणांना काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन प्रवेश नाही


नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्था अक्षरशः डळमळीत झाली आहे. सरकारने अशा संकट काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी देशातील विविध धार्मिक स्थळांच्या ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जस्वरुपात ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपविरुद्ध काँग्रेस असे युद्ध पेटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतानी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोने ताब्यात घेण्याच्या वक्तव्यानंतर मोठा निर्णय जाहीर केला आहे. काशी विश्वनाथ मंदिरात पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजीवन प्रवेश देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर देशभरातील इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांनीही चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचे आवाहन या महंतांकडून करण्यात आले आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचेही महंतांनी म्हटले आहे.

काशी विश्वनाथ मंदिरात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच 1983 साली चोरी झाली होती. काँग्रेसने या चोरीत मुख्य भूमिका बजावल्याचा आरोप काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि डॉ. कुलपती तिवारी यांनी केला आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment