कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत चीनच्या पुढे भारत


नवी दिल्ली : कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारताने चीनला मागे टाकले आहे. आज भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 85 हजार 784 च्या वर पोहोचला आहे. तर ज्याठिकाणी कोरोनाचा जन्म झाला त्या चीनमध्ये सध्या 84 हजार 031 कोरोना रुग्ण असल्याची माहिती अमेरिकेच्या जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीच्या कोरोना विषाणू रिसोर्स सेंटरने दिली आहे.

काल चीनमध्ये 82 हजार 929 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर काल भारतात 82,085 रुग्ण होते. पण हा आकडा वाढून आता थेट 85 हजार 784 वर पोहोचला आहे. तर 84 हजार 031 कोरोनाबाधितांची चीनमध्ये नोंद झाली आहे. म्हणजेच भारतात चीनच्या तुलनेत 1 हजार 753 अधिक रुग्ण आहेत.

कोरोना व्हायरसने भारतात थैमान घातले असून कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 2 हजार 649 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात भारतात तब्बल 3 हजार 699 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत भारतातील 27 हजार 900 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Leave a Comment