चीनप्रमाणेच भारत वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणार का?


मुंबई : चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने आज जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यातच जगभरात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत चीन आणि भारत हे दोन देश अग्रस्थानी आहेत. सध्या स्थितीत चीनची 150 कोटी तर भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. पण ज्या देशात कोरोनाचा उगम झाला त्या चीनमधील सुरुवातीच्या काळातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारी जवळ भारत पोहचला आहे.

विशेष म्हणजे चीनमधील 79 हजार 256 लोक कोरोनामुक्त झाले आहेत तर 4 हजार 644 लोक मृत्युमुखी पडले आहेत. सध्याच्या घडीला चीनमध्ये फक्त 132 कोरोनाबाधित आहेत. भारतातील 27 हजार 969 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 2649 मृत्युमुखी पडले आहेत. भारतात सध्याच्या घडीला 51 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत. तर भारतातील रुग्णसंख्येत गेल्या 10 दिवसांपासून दररोज 3 हजारांपेक्षा जास्तने कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. 31 डिसेंबरला रोजी चीनमध्ये पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली, तिथे 80 हजार रुग्ण व्हायला 63 दिवस लागले होतो. त्यानंतर चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवले, रुग्ण आणि बळींची संख्या कमी होत गेली.

30 जानेवारीला केरळ राज्यात भारतातील पहिल्या रुग्णाची नोंद झाली म्हणजे भारतातील 80 हजार रुग्ण संख्या व्हायला 107 दिवस लागले. आता खरी कसोटी आहे, आपल्याला देखील चीनप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवणे जमेल का याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. भारतात कोविडचा पहिला रुग्ण सापडला त्याच्या 74 दिवसांनंतर पहिला बळी गेला. 13 मार्च ते 19 एप्रिल म्हणजे त्यानंतरच्या 38 दिवसात 500 बळी गेल्यानंतर 500 ते 1000 बळींचा टप्पा पूर्ण व्हायला 10 दिवस लागले तर 1 हजार ते 1500 बळींचा टप्पा पूर्ण व्हायला ७ दिवस लागले. त्यानंतरच्या 5 दिवसात 1500 ते 2 हजार बळींचा टप्पा तर 2 ते अडीच हजार बळींचा टप्पा 5 दिवसात पूर्ण केला.

Leave a Comment