कोरोनाचा इफेक्ट; 13 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार झोमॅटो


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योग क्षेत्रांना बसला आहेच, पण या फटक्यातून ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यादेखील सुटलेल्या नाहीत. ऑनलाईन फूड डिलिव्हरीत अग्रेसर अशा झोमॅटोने या संकटात आता आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोने हा निर्णय आजा जाहीर केला आहे. त्याचबरोबर जून महिन्यापासून 50 टक्के पगार कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही पगार कपात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे.

देशभरात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. परिणामी कोरोनामुळे भारतील अर्थव्यवस्थेला जबरदस्त झटका बसला असल्यामुळे अनेक व्यवसाय सध्या बंद होण्याच्याही मार्गावर आहेत. झोमॅटोसारख्या अग्रेसर कंपनीलाही याचा फटका बसला आहे. या संदर्भात झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या नोटीशीमध्ये संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी स्पष्ट केले की, आमच्या कामावर आम्हाला लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि हीच आमची इच्छा आहे. पण भविष्यात आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे आम्हाला जमणार नाही. तसेच येत्या 24 तासात सर्व टीम लीडर्सकडून ज्यांची नोकरी गेली आहे, त्यांना झूम कॉल करून सांगण्यात येणार आहे आणि ज्यांची नोकरी टिकली आहे. त्यांनाही त्या स्वरूपाचा मेल एचआरकडून येईल, असेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment