ग्रेट खली सध्या गवंडीकाम, स्वयंपाकात मग्न

फोटो साभार जागरण

डब्ल्यूडब्ल्यूई स्पर्धेत २००७ मध्ये वर्ल्ड हेवीवेट चँपियनशिप जिंकणारा पाहिला भारतीय ठरलेला दलीपसिंग राणा उर्फ ग्रेट खलीचे एक वेगळेच रूप सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकानी आश्चर्य व्यक्त केले असले तरी खली मनापासून हाती घेतलेले काम पूर्ण करताना दिसत आहे. विटा रचून हाती ओळंबा, थापी घेतलेला खली गवंडी बनून भिंती बांधताना जसा दिसतो आहे तसाच भजी तळताना, जिलबी बनविताना, लाकडे कापताना, ट्रॅक्टर, जेसीबीच्या सहाय्याने जमीन सलग करताना, झाडांची काळजी घेतानाही दिसतो आहे.

खली हरियाना मध्ये कर्नाल कुरुक्षेत्र सीमेवर त्याची आंतरराष्ट्रीय दर्जाची अकादमी बांधतो आहे.  त्यासाठी स्पर्धेतून मिळविलेला सर्व पैसा त्याने ओतला आहे. पण करोनामुळे मजूर मिळत नाहीत. त्यासाठी तो अडून बसलेला नाही. त्याला हे बांधकाम लवकर पूर्ण करायचे आहे म्हणून मिळाले तेवढे कामगार घेऊन त्याने काम सुरु ठेवले आहे. त्यामुळे तो कधी गवंडी, कधी कामगारांसाठी जेवण बनविताना दिसत आहे.

या बाबत खलीचे म्हणणे असे आहे, करोनाला हरवायाचे असेल तर शरीर तंदुरुस्त हवे त्यामुळे तो मजुरांना मधून मधून कब्बडी खेळायचे प्रशिक्षण देतोय. तो म्हणतो करोना आज रिअल लाईफ बॉस वाटतो आहे पण तो हरणार आहे. त्याच्या अकादमी मध्ये एक फूड कोर्ट असेल तेथे खेळाडूंच्या डाएटची काळजी घेतली जाणार आहे. सध्या कराव्या लागत असलेल्या कामांबद्दल तो म्हणतो, परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा ही कामे मी केली आहेत. त्यामुळे कुठल्याच कामाची लाज वाटत नाही. देशाला पुन्हा विश्वगुरू बनविण्याचा त्याचा निर्धार आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment