नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख मायकल जे रेयान यांनी काल कदाचित कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही. त्याचबरोबर अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. त्यामुळे आता जगाला या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा दिला आहे
जगाला आता या कोरोनासोबत जगणे शिकावे लागेल; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
यासाठी त्यांनी एचआयव्हीच्या विषाणूचे उदहारण दिले. आजही एचआयव्हीचा विषाणू अस्तित्वात आहे, त्यामुळेच कोरोना नेमका कधी निघून जाईल, ते सांगता येणे शक्य नसल्याचे रेयान म्हणाले. अद्यापही एचआयव्ही सारखा विषाणू नष्ट होऊ शकलेला नाही. पण या विषाणूची ज्यांना लागण झाली आहे. त्यावर आपण त्यांना उत्तम आरोग्य राखून दीर्घायुष्य कसे लाभेल ते मार्ग शोधले आहेत. सद्यस्थितीत आपल्याला वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. कोरोना कधी संपेल ते आपल्याला ठाऊक नसल्याचे रायन म्हणाले.