देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 हजार पार; तर आतापर्यंत 2549 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसचे देशावर आलेले संकट दिवसेंदिवस आणखीनच गडद होत असल्यामुळे देशभरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 हजारांच्या पार पोहोचला आहे. आतापर्यंत 78 हजार 03 लोकांना कोरोनाची लागण झाली असून कोरोनामुळे आतापर्यंत 2549 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 26235 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मागील 24 तांसांमध्ये 3722 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 134 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 975, मध्यप्रदेशमध्ये 232, गुजरातमध्ये 566, दिल्लीमध्ये 106, तामिळनाडूमध्ये 64, तेलंगणामध्ये 34, आंध्रप्रदेशमध्ये 47, कर्नाटकात 33, उत्तर प्रदेशमध्ये 83, पंजाबमध्ये 32, पश्चिम बंगालमध्ये 207, राजस्थानमध्ये 121, जम्मू-काश्मीरमध्ये 11, हरियाणामध्ये 11, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, बिहारमध्ये 7, ओडिशामध्ये 3, आसाममध्ये 2, हिमाचल प्रदेशमध्ये 2, मेघालयमध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असून महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 26 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात असून एकूण कोरोना बाधित 9267 रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू असून 9227, राजधानी दिल्लीमध्ये 7998, राजस्थानमध्ये 4328, मध्यप्रदेशमध्ये 4173, उत्तरप्रदेशमध्ये 3729, आंध्रप्रदेशमध्ये 2137, तेलंगणामध्ये 1367 आणि बिहारमध्ये 940 कोरोनाबाधित आहेत.

Leave a Comment