लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावला मेकअप मॅन


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. आता पर्यंत लॉकडाऊनच्या तीन टप्प्यांचा देशातील नागरिकांनी चांगलाच अनुभव घेतला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच क्षेत्रातील उद्योगधंदे बंद आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे हजारो लोकांचा रोजगार गेला आणि जनजीवन विस्कळीत झाले. अशीच काहीशी अवस्था छोट्या पडद्यावरील कलाकार मंडळींच्या बाबत देखील झाली आहे. आर्थिक टंचाईमुळे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर त्रस्त आहे. पण या प्रतिकूल परिस्थितीत तिच्या मेकअप मॅनने मदतीचा हात पुढे केल्याची माहिती सोनलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन आपल्या चाहत्यांना दिली आहे.

View this post on Instagram

@pankajgupt09 ♥️

A post shared by Sonal Vengurlekar (@sonal_1206) on


देशात सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे माझे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मी केलेल्या कामाचे पैसे अद्याप मला मिळालेले नाहीत. परिणामी पुढचा महिना कसा काढायचा हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. परंतु या प्रतिकूल परिस्थितीत माझा मेकअप मॅन माझ्या मदतीला धावून आला. मला १५ हजार रुपये त्याने देऊ केले. दरम्यान त्याची बायको देखील गरोदर आहे. तरी देखील त्याने मला मदतीचा हात पुढे केल्याची भावनिक पोस्ट सोनलने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘आर के लक्ष्मण की दुनिया’, ‘साम दाम दंड भेद’, ‘तेरे नाल इश्क’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये सोनल वेंगुर्लेकरने काम केले आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर तिची ही इन्स्टा पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. शेकडो नेटकऱ्यांनी काही तासांत यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत तिच्या मेकअपमॅनचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Leave a Comment