जगभरातील 16.50 लाखांहून अधिक लोकांची कोरोनावर मात


मुंबई : जीवघेण्या कोरोना व्हायरसचा जगभरातील 212 देशांमध्ये कहर कायम असून जगभरात कोरोनाची लागण झालेले 44 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर दोन लाख 97 हजारांवर कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या गेली आहे. दरम्यान 88,202 नवीन कोरोनाबाधित असल्याचे मागील 24 तासात समोर आले आहे. त्याचबरोबर मागील 24 तासात 5314 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 97 हजार 765 वर पोहोचली आहे. यात दिलासादायक वृत असे जगभरातील 16 लाख 57 हजार 716 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 32 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात सध्याच्या घडीला कोरोनाचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळे 2551 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर अमेरिकेला जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना रुग्ण तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,430,348 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 85,197 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्रिटनमधील 33,186 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 229,705 एवढी झाली आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,104 लोकांचा मृत्यू झाला आहे. 271,095 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,106 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 222,104 एवढा आहे.

जगात जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 85 हजारांवर गेला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौदाव्या स्थानावर भारतात आत्ता कोरोनाचे 67 हजार 161 रुग्ण तर 2212 बळी कोरोनामुळे गेले आहेत.

Leave a Comment