ठाकरे सरकारने थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा समावेश करावा


मुंबई – उद्या म्हणजे १४ मे रोजी (तारखेप्रमाणे) छत्रपती संभाजी महाराजांची ३५९ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक मागणी केली आहे. थोर महापुरुषांची दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महारांचे नाव नसल्याबद्दल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विटवरुन आपली नाराजी व्यक्त करत राज्य सरकारने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.


मंगळवारी ट्विटवरुन कोल्हे यांनी राज्य सरकारच्या महापुरुषांशी संबंधित दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे निर्दर्शनास आणून दिले. छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात असलेले योगदान न विसरण्याजोगे आहे. थोर महापुरुषांची दिनविशेष यादी राज्य सरकारने बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे आपल्या ट्विटमध्ये कोल्हे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपाचरिक ट्विटर हॅण्डलला त्यांनी टॅग करत, विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी, असेही म्हटले आहे.

Leave a Comment