धक्कादायक…! मालेगावचे महापालिका आयुक्त निघाले कोरोनाबाधित


मालेगाव – देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असतानाच रेड झोनमध्ये असलेल्या मालेगावमधील महापालिकेच्या आयुक्तांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा टेस्ट रिपोर्ट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत आढावा बैठक सुरू असताना आला. हा रिपोर्ट समजताच आयुक्त बैठकीतून बाहेर पडले. आरोग्य मंत्र्यांसमवेत या बैठकीत, कृषीमंत्री दादा भुसे, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. मालेगाव पालिकेतील आणखी एक अधिकारी कोरोनाबाधित असल्याचीही माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारसोबच शहर प्रशासनाची मालेगाव शहरात उद्भवलेल्या कोरोना संकटाचा मुकाबला करताना दमछाक होत असताना, नेमून दिलेल्या कामावर महापालिकेचे काही कर्मचारी हजरच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाने अशाप्रकारे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. त्यानुसार एकूण ४७ जणांवर आतापर्यंत अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आलेली आहे.

Leave a Comment