भाजी विकणाऱ्या मुलीला पोलिसांनी मोपेड भेट देत जिंकले मन

आसाममधील डिब्रुगड पोलिसांनी केलेल्या कृत्याची सध्या सोशल मीडियावर कौतूक होत आहे. पोलिसांनी सायकलवर पालेभाज्या विकणाऱ्या जनमोनी गोगोईला बाईक भेट दिली आहे. डिब्रुगड पोलिसांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती शेअर केली. डिब्रुगढ पोलिसांनी सांगितले की, तिच्या आत्मसन्मानापासून प्रेरित होऊन डीजीपी आसाम पोलिसांच्या सांगण्यावरून तिला दुचाकी भेट देण्यात आली.

जनमोनी गोगोई डिब्रुगढ जिल्ह्यातील बोगीबील येथे राहणारी आहे. तिने जिल्ह्यातील सरकारी शाळेतून 12वी पर्यंतचे शिक्षण घेतले असून, तिला पुढे देखील शिक्षण सुरू ठेवायचे आहे. मात्र घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने तिला सायकलवरून फळ-भाज्या विकाव्या लागत आहेत. त्यामुळे पोलिसांनी तिला दुचाकी देऊन तिचे काम सोपे केले आहे.

डिब्रुगड पोलिसांचे हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतूक केले.

Leave a Comment