नाशिकमध्ये तैनात असलेले १७ पोलीस कोरोनाच्या विळख्यात


नाशिक – राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आपल्या रक्षणासाठी कार्यरत असलेले कोरोना वॉरिअर्स देखील या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात सापडत असून ही आपल्या सर्वांसाठीच धक्कादायक बाब आहे.

नुकतेच नाशिकमधील १७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी विविध जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगावमध्ये तैनात असलेल्या तब्बल १०० पोलिसांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यात आता १७ पोलीस कर्मचाऱ्यांची वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाशिकमध्ये आलेल्या अद्ययावत माहितीनुसार, कोरोनाच्या ६३ रुग्णांचे चाचणी अहवाल समोर आले असून त्यातील ४८ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या तर १५ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये सर्व पोलीस कर्मचारी आहेत.

Leave a Comment