जगभरात कोरोनाचा कहर जैसे थे, कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 लाखांच्या पार


मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून बहुतांश सर्वच देश या व्हायसरमुळे हतबल झाले आहेत. त्यातच जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 लाख 35 हजारांच्या पार झाला आहे. तर कोरोनामुळे आजपर्यंत दोन लाख 92 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 92 हजार 815 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंत जगभरातील 16 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 30 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर असून भारतात आत्ता कोरोना बाधित 74 हजार 292 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळे 2415 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर अमेरिकेला जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. गेल्या 24 तासात अमेरिकेने 1630 लोक गमावले आहेत. तर एकूण बळी 83 हजार 425 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या 14 लाख 8 हजारांवर गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये काल 172 बळी गेले. तिथे एकूण मृतांचा आकडा 27 हजार 175 तर रुग्णांची संख्या 3 लाख 48 हजारांवर गेली आहे.

त्या खालोखाल न्यूजर्सीत 9541, मासाचुसेट्स 5141, मिशिगन मध्ये 4674, पेनसिल्वानिया 3918, इलिनॉईस 3601, कनेक्टिकट 3041, कॅलिफोर्निया 2876, लुझियाना 2347, फ्लोरिडा 1782, मेरीलँड 1756, जॉर्जिया 1494, टेक्सास 1179 आणि वॉशिंग्टनमध्ये 964 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

गेल्या चोवीस तासात स्पेनमधील 176 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर तेथील मृतांचा एकूण आकडा 26 हजार 920 वर पोहोचला आहे. इटलीत गेल्या चोवीस तासात कोरोनाने 172 माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 30 हजार 911 वर पोहोचली आहे. काल रुग्णांची संख्या 1402 ने वाढली असून इटलीत आता जवळपास 2 लाख 21 हजारावर रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात इंग्लंडमधील 627 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथील बळींची संख्या 32 हजार 692 वर पोहोचली असून फ्रान्सने काल दिवसभरात 348 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 26 हजार 991 बळी गेले आहेत. तर एकूण रुग्णसंख्या 1 लाख 78 हजारांवर पोहोचली आहे.

रशिया रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे 2 लाख 32 हजारावर रुग्ण असून काल 107 बळी गेले, एकूण 2116 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 48 ची भर पडली. एकूण 6733 मृत्यू झाले असून रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजारांवर गेली आहे.

कोरोनाने बेल्जियममध्ये काल 54 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 8761 एवढा आहे. हॉलंडमध्ये काल 54 बळी घेतले तिथे एकूण 5510 लोक दगावले आहेत. ब्राझिलमध्ये 12404, कॅनडात 5169, टर्की 3894, स्वीडनमध्ये 3313, स्वित्झर्लंडने 1867, पोर्तुगाल 1163, इंडोनेशिया 1007, इस्रायल 260 तर कोरोनामुळे सौदी अरेबियात 264 बळी गेले आहेत.

गेल्या पाच दिवसानंतर दक्षिण कोरियात काल पहिल्यांदा मृत्यूची नोंद झाली, काल 2 बळी गेले, तिथे रुग्णांची संख्या 27 ने वाढली एकूण रुग्ण 10 हजार 936 तर मृतांचा आकडा 258 वर गेला आहे. पाकिस्तानात रुग्णांची संख्या 32 हजार 674 च्या वर पोहोचली आहे, तिथे काल 57 बळी गेले, एकूण मृतांचा आकडा 724 वर गेला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 85 हजार 335 तर बळींच्या आकड्यात 5 हजार 320 ची भर पडली आहे.

Leave a Comment