लॉकडाऊन मध्ये प्रवास करताय, अशी घ्या काळजी


फोटो साभार भास्कर
परराज्यातून कामानिमित्त दुसरीकडे आलेले किंवा राज्यातल्या राज्यातही घरापासून दूर असलेले अनेक नागरिक घरी परतण्याची वाट पाहत असून त्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. काही जण स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्याच्या तयारीत आहेत. मात्र करोनाचा धोका कायम असल्याने आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी या प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील गोष्टीची माहिती नक्की करून घ्यायला हवी.

सर्वात पहिले म्हणजे प्रवास करताना आपली तब्येत चांगली आहे ना याची खात्री करा. थोडासा जरी आजार असले तर प्रवास टाळा. प्रवासात प्रोटेक्टीव्ह फेसशीट अवश्य वापरा. रात्रीचा प्रवास असेल तर ही शीट चेहऱ्यावर राहील याची काळजी घ्या. प्रवासासाठी प्रत्येक प्रवाश्यामागे किमान ४-५ डिस्पोजेबल हँड ग्लोव्ह्स, मास्क सोबत असू द्यात. वापरलेले मास्क आणि ग्लोव्हज टाकण्यासाठी एक पिशवी सोबत असू द्या.


फोटो साभार लेटेस्ट न्यूज
७० टक्के अल्कोहोल असलेले सॅनीटायझर वापरा आणि ही बाटली सहज हाताशी येईल अशी ठेवा म्हणजे सामानाची वारंवार उलथापालथ करावी लागणार नाही. लांब, ढगळ कपडे घालण्यापेक्षा स्कीन टाईट पण आरामदायी कपडे वापरा. टॉयलेट वापरताना उगीचच कुठेही स्पर्श करू नका. दरवाजे, नळ, फ्लश वापरल्यावर हात स्वच्छ धुवा शिवाय जागेवर आल्यावर सॅनिटायझर लावा.

खाण्याच्या पदार्थाची छोटी छोटी पॅकेट बनवून घ्या. शक्यतोवर पोळी, पराठा यांचे भाजी भरून रोल करा म्हणजे प्लेट, चमचे लागणार नाहीत. या सामानाची पिशवी वेगळी असूद्या. चमचे घेतले असतील तर व्यवस्थित रॅप करून घ्या.

कारने प्रवास करत असला तर शक्यतो दिवसा करा कारण अजूनही रात्री रस्ते सुनसान आहेत. रस्त्यात टोल द्यावा लागणार असेल तर नेमकी सुटी रक्कम द्या म्हणजे पैसे किंवा नोटा परत घेण्याची भानगड राहणार नाही. घरी पोहोचल्यावर सामान आणि स्वतःला सॅनिटाईज करा. रस्त्यात वारंवार गाडीचे स्टिअरिंग, हँडल्स, दरवाजे, काचा, खिडक्या, सीट, डॅशबोर्ड सॅनिटायझर वापरून पुसुन काढा.

Leave a Comment