सिंघम स्टाइल स्टंट करणे पोलिसाला पडले महागात, भरावा लागला दंड

मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील पोलीस उपनिरिक्षक मनोज यादव यांना दोन चालत्या कारच्या वरती उभे राहून सिंघम स्टाइल स्टंट करणे चांगलेच महागात पडले आहे. हा स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दमोहचे पोलीस अधिक्षक हेमंत चौहान यांना याबाबत तक्रार मिळाली.

चौकशी केल्यानंतर मनोज यादव यांना 5 हजार रुपये दंड लावण्यात आला असून, भविष्यात अशी चूक करू नये यासाठी चेतावणी देण्यात आली आहे.

यादव हे दमोह जिल्ह्यातील नरसिंहगढ पोलीस चौकीचे प्रभारी आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की दोन चालत्या कारवर उभे राहून सिंघम चित्रपटातील स्टंट करत आहेत. हा व्हिडीओ लॉकडाऊनमध्ये काढल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment