करोना संकटात ब्राझील राष्ट्रपतीची ऐयाशी


फोटो साभार झी न्यूज
ब्राझील मध्ये करोनाचा प्रकोप दिवसेनदिवस वाढत चालला असताना राष्ट्रपती जायर बोल्सोनारो मात्र करोना नियंत्रणासाठी रणनीती आखण्याची सोडून स्वतःचे शौक पूर्ण करताना दिसत आहेत. परिणामी त्याच्यावर सोशल मिडिया मध्ये टीकेची झोड उठली आहे. ब्राझील मध्ये करोनाचे दीड लाखाहून अधिक संक्रमित असून १० हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. द. अमेरीकेतील करोनाचा सर्वाधिक फटका याच देशाला बसला आहे.

अश्या परिस्थितीत बोल्सोनारो नुकतेच जेट स्कीची मजा लुटताना दिसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अगोदर ३० पाहुण्यांसोबत बार्बेक्यू पार्टी करायची होती पण नागरिकांकडून प्रचंड टीकेला सामोरे जावे लागल्याने त्यांनी पार्टी रद्द केली आणि पॅरोना सरोवरात जेट स्कीइंग करण्यात बराच वेळ खर्च केला. अर्थात राष्ट्रपतीची ही वर्तणूक देशाला नवी नाही. यापूर्वी त्यांनी करोना म्हणजे साधा ताप खोकला आहे असे वक्तव्य केले होते आणि ब्राझील मध्ये करोना मुळे नागरिकांचे प्राण जाऊ लागले तेव्हा त्यांना त्याबाबत विचारले गेल्यावर, ‘ मग त्याला मी काय करू’ असे उत्तर दिले होते.

राष्ट्रपतींनी करोना गंभीरपणे घेतला नसला तरी ब्राझील मधील २७ राज्यांचे गव्हर्नर आणि महापौर करोना नियंत्रणासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी ३१ मे पर्यंत नागरिकांवर निर्बंध कयाम राहणार आहेत.

Leave a Comment