पुण्यातील या संस्थेने तयार केली पहिली स्वदेशी अँटीबॉडी टेस्ट किट


पुणे : पूर्ण देश कोरोनाविरोधातील लढाई संपूर्ण ताकदीनिशी लढत असतानाच पुण्याने आणखी एका मोठे काम केले आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (National Institute of Virology) देशातील पहिली अँटीबॉडी टेस्ट किट विकसित केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. या टेस्ट किटच्या माध्यमातून शरीरात अँटीबॉडीस तयार झाल्या की नाहीत याची माहिती मिळणार असून त्याचा कोरोना उपचारासाठी मोठा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थे एका महिन्याच्या आत ही किट विकसित केली आहे. त्यामुळे आता अशा प्रकारच्या टेस्ट अतिशय कमी खर्चात आणि जलद गतीने करता येणार आहेत. पुढील उपचारासाठी त्याचा मोठा उपयोग होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचे आकडे हे दिवसेंदिवस वाढतच असून पुणे आणि मुंबईतील कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. काल दिवसभरात पुण्यात 102 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर पाच कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात 194 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 92 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2482 वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 145 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment